शनिवार, २६ जुलै, २००८

मुळ्याचे थालीपीठ

वाढणी:२-३ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दोन मध्यम आकाराच्या मुळ्यांचा कीस ( कीस पिळून त्यातले पाणी काढून टाकावे म्हणजे उग्र वास कमी होतो. )
एक बारीक चिरलेला कांदा, प्रत्येकी एक वाटी तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसन, अर्धा टीस्पून धने-जिरे पावडर,
पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून साखर, ओल्या खोबऱ्याचे पातळ तुकडे,
२-३ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चवीपूरते मीठ, तेल.
क्रमवार मार्गदर्शन:
तेल वगळता सगळे साहित्य एकत्र करून जरूरीपूरते पाणी घालून मळून घ्यावे. प्लास्टीकच्या कागदावर तेलाचा हात लावून थालीपीठ थापावे. मग तव्यावर तेल गरम करून मंद आचेवर भाजावे. दही किंवा लोण्यासोबत सर्व्ह करावे.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:मुळ्याऐवजी गाजर, बीट वापरूनही हे थालीपीठ छान होते।
हे मनोगत वरुण घेतले आहे.