शुक्रवार, १८ जुलै, २००८

पहिली भेट

प्रेषक अनंतसागर ( शुक्र, 07/11/2008 - 21:31) .

सायंकाळी कातरवेळीप्रेमज्योत मनी पाझळलीपरतीच्या त्या रस्त्यावरतीमाझी सोबतीन मला भेटली.
मी होतो उधान धुंदीतचर्या तिची गंभीर निवांत.प्रवासात त्या मला लाभलीक्षणभर तिची अनमोल साथ.
न राहून ती मज संगे बोललीप्रेमकळी मन्मनी खुलली.होतो कधी अनोळखी आम्हीदाट मैत्री आता जाहली.
आता आमुच्या गप्पा रंगल्याखळ्या तिच्या गालावर खुलल्या.पाहताना तिचे गोड रुप तेप्रेम कविता मनी उमलल्या.
निरोप देता झालो बैचेनविरहाने दुभंगले मन।आपण भेटू पुन्हा लवकरअसे तिने मला दिले वचन.
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.