मंगळवार, २२ जुलै, २००८

सोजी हलवा मनीमाऊ शनि, ०६/०५/२००६ - ०१:१४.

वाढणी:२-३
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दूध-१/२ लिटऱ
साखर-१ वाटी
गव्हाचा जाडा रवा (सोजी)-पाऊण वाटी
काजू-पिस्त्याचे तुकडे
वेलची-जायफ़ळ पूड
२ चमचे तूप
क्रमवार मार्गदर्शन:
तुपावर रवा किंचित भाजून वरून दूध घालावे.
शक्यतो न चिकटणाऱ्या भांड्यात करावे.
उकळी आल्यावर साखर घालावी.
किंचित पातळ असतानाच भांडे उतरवावे. आपोआप आटतो हलवा.
उतरवल्यावर काजू, वेलची घालावे.

माहितीचा स्रोत:मनीमाउची आई
अधिक टीपा:
पौष्टिक खाऊ!
साखरेसोबत थोडा गूळही चांगला लागतो. पण उतरवल्यावर घालावा, नाहीतर दूध नासण्याची भिती असते.(मनीमाऊला नही आवडत दूध नासलेले!!)

हे मनोगत वरुण घेतले आहे.