मंगळवार, १५ जुलै, २००८

खोबऱ्याचा बिनाअंड्याचा केक स्वाती दिनेश सोम, २५/०६/२००७ - १४:१७.

वाढणी:४,५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१७५ ग्राम साखर,२५० ग्राम मैदा,१२५ ग्राम खोवलेले खोबरे
४ चमचे तूप/लोणी,पाव कप दूध,१.५ चमचे वॅनिला अर्क,२.५ चमचे बोकिंग पावडर
क्रमवार मार्गदर्शन:लोणी भरपूर फेटा,साखर घालून फेटा, खोबरे घालून फेटा,दूध+वॅनिला अर्क घालून फेटा.मैदा+बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्या.व वरील मिश्रणात घालून फेटा.केक च्या साच्याला लोणी लावून घ्या.व त्यात हे मिश्रण घाला. १८० ते २०० अंश से. वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
माहितीचा स्रोत:सौ.आई
अधिक टीपा:प्राजु, बिन अंड्याच्या केकच्या अजून एक दोन पाकृ आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करते आहे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.