मंगळवार, २२ जुलै, २००८

खमंग फूलकोबी अनु शनि, ३१/१२/२००५ - ०१:१७.

वाढणी:खाणाऱ्यांच्या भुकेवर
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२-३ मध्यम आकाराच्या ताज्या फुलकोबी(फ्लॉवर)
चाट मसाला
तिखट
मीठ
चंदेरी कागद(ऍल्युमिनीयम फॉइल)
माती(उपलब्ध असल्यास)
शेकोटी(उपलब्ध असल्यास),नसल्यास तेल व कढई चालेल.
कढईत करायचा बेत असल्यास ३ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
क्रमवार मार्गदर्शन:
१. फूलकोबीची मोठी मोठी फुले कापावीत. २. फुलांना चवीनुसार/आवडीनुसार मीठ, तिखट व चाट मसाला नीट लावावा.३. शेकोटीत भाजत असल्यास पूर्ण फुले एक एक करुन ऍल्युमिनीयम फॉइल मधे पूर्ण व्यवस्थित गुंडाळावीत४. शेकोटीत भाजत असल्यास या गुंडाळलेल्या ऍल्युमिनीयम फॉइल वर ओल्या मातीचा १ मीमी जाडीचा थर द्यावा व शेकोटीत खरपूस भाजावे. ५. घरीच साध्या कढईत तळत असल्यास ३ चमचे कॉर्नफ्लॉवर मधे पातळ होईल इतपत पाणी व मीठ घालावे व त्यात सर्व फुले व्यवस्थित घोळवून फिकट तपकिरी रंगावर तळावी. फुलांच्या देठाला चंदेरी फॉइल गुंडाळून गरम गरम वाढावी.

माहितीचा स्रोत:हॉटेले व अशीच एक शेकोटी बैठक
अधिक टीपा:छान शनिवारच्या रात्री/दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल अशा रात्री शेकोटीपाशी आपला कंपू, भुताच्या गोष्टी, आणि बरोबर ही खमंग फुलकोबी आणि असल्यास भाजलेले बटाटे। अप्रतिम. अशा रात्री वेळ कसा जातो कळतच नाही. आणि हॉटेल मधे खाण्याच्या आधी 'व्हेज लॉलीपॉप' या आंग्ल नावात गुंडाळून येणारी चंदेरी विजारी घातलेली फुलकोबीतील फुले तर आपल्या माहितीची असतीलच. फ्लॉवरची भाजी न आवडणारे बरेच जणही ही खमंग फुले आवडीने खाताना आढळले आहेत.
हे मनोगत वरुण घेतले आहे.