शनिवार, २६ जुलै, २००८

पल्ली (डोसा चटणी)

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
एक वाटी शेंगदाणे
लसूण एक पाकळी
४ हिरव्या मिरच्या
२ लाल काश्मिरी मिरच्या
चिंच
फोडणीकरिता जिरे,मोहरी,कडीपत्ता व तेल, चवीपुरते मीठ व साखर
क्रमवार मार्गदर्शन:मंद आचेवर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावेत. शेंगदाणे भाजत आले कि, त्याच तव्यावर ४ हिरव्या मिरच्याही भाजायला ठेवा. नंतर शेंगदाणे,लसूण,हिरव्या मिरच्या,चिंचेचा कोळ,मीठ व साखर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. गरजेपुरते पाणी घालून परत एकदा फिरवून घ्या.नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्याला वरून जिरे, मोहरी ,कडीपत्ता व कश्मिरी मिरच्यांची फोडणी द्या. पल्ली उर्फ शेंगदाण्याची चटणी तयार. ही चटणी सेट डोश्याबरोबर एकदम छान लागते. सोपीही आहे. १५ मिनिटात तयार.
माहितीचा स्रोत:दाक्षिणात्य मैत्रिण रमा
अधिक टीपा:यात लसूण फार घालू नये। एका वाटासाठी एक पाकळी किंवा त्यापेक्षा कमी ही पुरे होते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.