मंगळवार, १५ जुलै, २००८

चॉकलेट केक मन्जुशा बुध, २७/०६/२००७ - १६:२५.

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ कप मैदा, ३/४ कप साखर, १/२ दही, १/२ घट्ट साय, १ छोटा
चमचा बेकिंग पावडर, १/२ छोटा चमचा खायचा सोडा, ५ चमचे दूध,
२ मोठे चमचे कोको पावडर
क्रमवार मार्गदर्शन:मैदा, कोको पावडर, सोडा व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. एका भांड्यात दही, साय आणि साखर हलकं होईपर्यंत फेटून घ्या. त्यात चाळलेला मैदा थोडा थोडा टाका व दूध टाकून फेटा (हा हा हा) . फार फेटू नये. एका भट्टीत ठेवायच्या भांड्याला तूप लावून हे मिश्रण ओता. १८० डिग्री तापमानावर ३०-३५ भाजा. १० मिनिट केक बाहेर काढू नये.
माहितीचा स्रोत:आठवत नाही.
अधिक टीपा:केक छानच लागतो। केकवर आईस्क्रीम व चॉकलेट सॉस टाकून छानसं डेझेर्ट करता येतं.
हे मनोगत वरुण घेतले आहे.