सोमवार, २८ जुलै, २००८

ग्रिल्ड् चीझ सँडविच..

वाढणी:फक्त्त तुमच्या साठी.
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पावाचे स्लाईस ४
क्राफ्ट चीझ स्लाईस २
बटर - स्लाईसना दोन्ही बाजूंनी लावण्या पुरते.
क्रमवार मार्गदर्शन:
चारही स्लाईसना बटर दोन्ही बाजूंनी लाऊन घ्या.
फ्राय पॅन किंवा तव्यावर चारही स्लाईस मध्यम आंचेवर भाजायला ठेवा. खालून सोनेरी लाल झाले की दोन स्लाईस उलटून ते गरम असतानाच, (तव्यावरच), लाल सोनेरी बाजूंवर, क्राफ्ट चिझचा स्लाईस ठेवा. आता या चिझवर दुसरे स्लाईस सोनेरी लाल बाजू चिझवर येईल असे ठेवा. आता हे दोन सँडविच दोन्ही बाजूंनी लाल सोनेरी भाजून घ्या. नंतर खाली उतरवून त्याच्या कडा कापून त्यांना 'त्रिकोणी' कापा. प्लेट मध्ये, सँडविच भोवती लेट्यूसची पाने लावून, टोमॅटो केचप बरोबर, टिव्ही वरील कार्यक्रम बघता बघता, आस्वाद घ्या.
शुभेच्छा...!
अधिक टीपा:
'क्राफ्ट' ब्रँडचे छेडर चीझ चवीला चांगले आहे. पण सँडवीचसाठी तेच असले पाहीजे अशी सक्ती नाही. कुठलेही, तुम्हाला आवडणारे, स्लाईस चिझ वापरा. स्लाईस चिझ नाही मिळाले तर, चिझचा ठोकळा (लॉग) आणून तो पावावर भरपूर किसून वापरावा.
वेट वॉचर्स, किप अवे...!
हे मनोगत वरुण घेतले आहे.