मंगळवार, २२ जुलै, २००८

गाजराचा सलाद माधवी घरडे शुक्र, २४/०२/२००६ - ०६:४५.

वाढणी:३-४ जणांकरता
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३-४ गाजर,२हिरव्या मिरच्या,मोहरी,ओल्या नारळाचा किस(१/२ वाटी),मीठ चवीनुसार,लिंबू हवे असल्यास
थोडे तेल
क्रमवार मार्गदर्शन:
आधी गाजर उकळून घ्यावेत(लगदा होईल एवढे नकोत) त्यानंतर त्याचे बारिक चोकोनी काप करावेत.मग कढईत थोडे तेल ओतावे(२ टिस्पून).त्यात थोडी मोहरी टाकावी .मोहरी तडतडल्यास कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात,मीठ टाकावे.मग त्यात आधी उकळून काप केलेले गाजराचे तुकडे टाकावे.थोडे परतून घेवून त्यात ओल्या नारळाचा किस टाकावा.५ मीनिटे शिजू द्यावे.वाटल्यास लिंबू वरून पिळले तरी चालेल.
[ह्यात गाजर भाजून घेतले तर फ़ारच छान पण अलिकडे चुलि फ़ार कमी लोकांकडे आहेत.(चुलीवर भाजलेल्या गाजराची चव निराळीच).]
माहितीचा स्रोत:माझी आजी(आता ती हयात नाही,पण जुन्या आठवणी ताज्या व्हाव्यात म्हणून)
हे मनोगत वरुण घेतले आहे.