मंगळवार, १५ जुलै, २००८

पेढा दिपाली पाटिल गुरु, ०६/१२/२००७ - ०६:४५.

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ लीटर दूध , ५ - ६ चमचे लिम्बू रस, ३/४ डबा कन्डेन्स्ड दूध,
१/२ वाटी दूध, १ टे स्पून साखर, ३ चिमूट केशर, वेलची पूड, बदाम काप,
बदाम पूड, पिस्ता काप, २ टी स्पून कोर्न फ़्लोर, १ छोटा चमचा तूप.
क्रमवार मार्गदर्शन:
१) दूध गरम करायला ठेवा.
२) दूध कोमट झाले कि लिंबू रस टाका. दूध नीट फाडून घ्या. पेढ्या साठी कोमट दूध च वापरावे.
३) एका कापडाने गाळून घ्या. पनीर वेगळे करून घ्या.
४) एकदम कमी आचेवर कढई ठेवा. कढई त थेंब भर तूप टाका. त्यात पनीर टाका.
५) नंतर कन्डेन्स्ड दूध , 1/2 वाटी दूध, 1 चमचा साखर, कोर्न फ्लोर टाका.
६) तो पर्यंत थोड्या गरम दूधात केशर भिजवून ठेवा म्हणजे रंग चांगला येईल.
७) सम्पूर्ण मिश्रण हलवत रहा. घट्ट होई पर्यंत.
८) मिश्रण सूटत आले कि केशर, थोडी बदाम पूड टाका, वेलची पूड टाकून नीट एकत्र करा.
९) थन्ड झाल्यावर पेढे बनवून त्यावर बदाम काप, पिस्ता काप लावा. पेढे तयार.
माहितीचा स्रोत:एक मित्र
अधिक टीपा:
हे पेढे ३-४ दिवस शीतपेटी शिवाय टिकतात.
साखर चवीप्रमाणे बदलू शकता.
उपासा साठी बनवायचे असल्यास कोर्न फ्लोर एवजी अरारूट टाका.
हे पेढे खुप च छान दिसतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.