सोमवार, २१ जुलै, २००८

बटाटा+कांदा+टोमॅटो उत्तर प्रदेशी भाजी स्वाती दिनेश शनि, २३/०९/२००६ - १०:४७.

बटाटा+कांदा+टोमॅटो उत्तर प्रदेशी भाजी स्वाती दिनेश शनि, २३/०९/२००६ - १०:४७।

वाढणी:३/४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
५,६ बटाटे,२ कांदे,२टोमॅटो,तेल २चमचे,हिंग,हळद,थोडे आले,कोथिंबीर
धने पावडर २ चमचे,२हिरव्या मिरच्या ,मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
बटाटे साले काढून मोठे तुकडे करुन घेणे,कांदे,टोमॅटोचे ही मोठे तुकडे करणे.
तेल गरम करणे,त्यात हिंग घालणे.हळद घालणे.बटाट्याचे तुकडे घालणे.थोडे आले किसून घालणे,धने पावडर घालणे,हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणे,मीठ घालणे,पाउण कप पाणी घालणे. झाकण ठेऊन मंद आचेवर ठेवणे‍. जेव्हा बटाटे अर्धे शिजतील तेव्हा कांदे व टोमॅटो घालणे व परत झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवत ठेवणे.पूर्ण एकजीव व्हायला हवे.
वरून कोथिंबीर घालणे.
माहितीचा स्रोत:सुधा मौसी-दिनेश च्या सहकाऱ्याची मावशी
अधिक टीपा:
बनारस च्या बाजूला अशा प्रकारची भाजी करतात.
वेगळी चव चांगली वाटते.
बटाटा , कांदा, टोमॅटो यांचे मोठ्ठे तुकडे करावे नाहीतर लगदा होतो.एका बटाट्याच्या ४ फोडी.तर कांदा व टोमॅटोचे ही मोठे तुकडे करावे.
आपण नेहमी तेलावर आधी कांदा टाकतो,मग इतर भाज्या..पण सुधा मौसी च्या पध्दतीत उलट आहे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.