शनिवार, २६ जुलै, २००८

दही पालक

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१-पालक जुडी
२ वाट्या दही
फोडणीचे साहित्य, लाल मिरच्या, मेथी
क्रमवार मार्गदर्शन:
पालक धुवून चिरून घ्यावा.पातेल्यात पाणी न घालता पाचकपात्रात मऊ शिजवून घ्यावा.शिजलेला पालक गार झाल्यावर त्यात दही आणि चवीला मीठ घालवे आणि चमच्याने सारखे करून घ्यावे.त्यावर थोड्या तेलाची (तुपाची आवडत असली तर तुपाची) फोडणी करून घालावी. फोडणीत लाल मिरच्या आणि मेथी घातल्याने चव आणि स्वाद छान येतो.
आहार नियंत्रणावर जेवण असलेल्यांना हाच जेवणाचा मुख्य पदार्थ म्हणून खाता येईल. बाकिच्याना कोशिंबीर/भाजी या स्वरूपात पोळी किंवा भाताबरोबर खाता येईल.
आपले मत जरूर कळवा.
कलोअ,सुभाष
अधिक टीपा:इथे बाजारात गोठवलेला आणि चिरलेला पालक नेहमी मिळतो तो वापरल्यास फारच लवकर तयार होणारा पदार्थ आहे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.