बुधवार, १६ जुलै, २००८

राघवदास लाडू जान्हवी देशपांडे बुध, १४/०२/२००७ - १८:५४.

वाढणी:भरपुर
पाककृतीला लागणारा वेळ:१५० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
चार वाट्या हरभऱ्याच्या डाळीचा रवा
एक वाटी तूप
अर्धा वाटी खवा
दोन वाट्या साखर
एक वाटी पाणी
एक चमचा काजू
एक चमचा बेदाणे
एक छोटा चमचा वेलदोडा पूड
क्रमवार मार्गदर्शन:रवा दुधामध्ये ओलसर होईपर्यंत भिजवून ठेवावा. तुपावर रवा खमंग भाजावा‌. साखरेत पाणी घालून रव्याच्या लाडवाप्रमाणे पाक करुन रवा,खवा व काजू-बेदाणा-वेलदोड्याची पूड पाकात टाकावी.मिश्रण एकसारखे करून दोन तासांनी लाडू वळावे.
माहितीचा स्रोत:सौ. नलिनीमामी
अधिक टीपा:साखर चवीनुसार कमीजास्त करावी
हे मनोगत वरुण घेतले आहे.