बुधवार, १६ जुलै, २००८

खजूर-बदाम-काजू मिल्क शेक रोहिणी शनि, १०/०२/२००७ - २३:१५.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
खजूर १२
बदामाची पूड २ मुठी
काजू पूड १ मूठ
दूध २ कप
साखर २ चमचे / आवडीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:एक कप थंडगार दूधामधे खजूर २-३ तास भिजत घालणे. नंतर ते मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक करणे. नंतर परत १ कप दूध घालणे. बदाम व काजू पूड घालणे. व आवडीनुसार साखर घालून परत एकदा बारीक करणे. असे हे दाट मिल्क शेक तयार होईल. पातळ/दाट हवे त्याप्रमाणे दूध घालणे.
माहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:-
हे मनोगत वरुण घेतले आहे.