मंगळवार, २२ जुलै, २००८

झटपट पिझ्झा साक्षी बुध, १८/०१/२००६ - ००:२०.

वाढणी:२ जणांना भरपूर
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
रवा पाव वाटी
आंबट ताक एक वाटी
गाजर , ढब्बू मिरची प्रत्येकी एक, कोबीची चार पाच पाने
एखादी मिरची बारीक चिरुन, थोडं आलं किसून, चवीपुरते मीठ
पावाचे स्लाइस पाच सहा
अमूल बटर / लोणी, चीज
क्रमवार मार्गदर्शन:
रवा ताकात १५ मिनिटे भिजवून ठेवावा. सर्व भाज्या बारीक चिरून त्या भिजवलेल्या रव्यात एकत्र कराव्या. आलं, मिरची, मीठ घालून मिश्रण परत नीट एकत्र करून घ्यावे.
पावाच्या एका बाजूला अमूल बटर किंवा लोणी व दुसऱ्या बाजूला ह्या मिश्रणाचा जाड थर द्यावा. ५ मिनिटे स्लाइस तसेच ठेवून द्यावेत.
तवा मध्यम आचेवर ठेवावा. तवा तापल्यावर पावाची अमूल लावलेली बाजू आधी भाजून घ्यावी व नंतर दुसरी बाजू भाजून घ्यावी.
ताटलीत ठेवून वरून चीज किसून घालावे. गरम गरम वाढावे.
माहितीचा स्रोत:मैत्रीण अंजली
अधिक टीपा:
१. उपलब्धतेनुसार कमी जास्त भाज्या आपण घालू शकतो
२. कच्च्या भाज्या असल्यामुळे हा पदार्थ पौष्टिक होतो.
हे मनोगत varun घेतले आहे.