मंगळवार, २२ जुलै, २००८

झट्पट कोथिंबीर वडी निर्मिती शुक्र, १७/०२/२००६ - ०४:०३.

वाढणी:२-३ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
चिरलेली कोथिंबीर १ वाटी
चण्याचे पीठ (बेसन) १ ते दीड वाटी
तिखट १ च. चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,हळद १/४ च. चमचा, तीळ १ च. चमचा (अथवा चवीप्रमाणे)
पाणी, इनो फ़्रुट सॉल्ट १/४ च. च.
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
कोथिंबीर धुवून ,निथळून एका भांड्यात घ्या.
इनो आणि पाणी सोडून इतर सहित्य एकत्र करा
नीट मिसळून घ्या.
पाणी घालून सैलसर भिजवा (साधारण भज्याच्या पीठासारखे/थलथलीत)
इनो किन्चित पाण्यात मिसळून लगेच मिश्रणात घाला ढवळा.
सुक्ष्म लहरी भट्टीत (मायक्रो वेव्ह ओव्ह्अन) वपरण्यायोग्य काचेच्या भांड्याला तेलाचा हात फ़िरवून मिश्रण ओता. झाकण ठेऊन १००% उष्णतेवर ३ते४ मि. ठेवा.मग झाकण काढून ५०% उ.वर १ मि. ठेवा.
बाहेर काढून वड्या कापा .तेलात परता अथवा खमंग तळा.
आणि व्वा! म्हणत खा.

माहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:ओल्या नारळाची चटनी किंवा सॉस बरोबर खाव्या।
हे मनोगत वरुण घेतले आहे.