सोमवार, २१ जुलै, २००८

केळ्याची वडी लम्बोदर बुध, १३/०९/२००६ - १५:१३.

वाढणी:५ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
केळी ५
रवा पाव किलो
साखर ५ चमचे
दुध १०० ग्राम
क्रमवार मार्गदर्शन:
केळी, रवा, दुध व साखर एकत्र मिसळुन पातळ सारण करावे.
(जास्त पातळ करु नये, थोडे जाडसर असु द्या)
मग हे सारण कुकरच्या डब्या मधे लावावे (कुकरची शिटी काढुन टाकावी)
३ शिट्या झाल्यावर व कुकर थंड झाल्यावर डबा काढुन (डब्यामधेच) वड्या कराव्यात.
झाल्या वड्या तयार.
आवडल्यास नक्की प्रतिसाद द्यावा
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:केळी गोड असल्याने साखरेचे प्रमाण आवडी नुसार टाकावे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.