मंगळवार, २२ जुलै, २००८

डाळ कोबी रोहिणी मंगळ, ०४/०४/२००६ - ००:५२.

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बारीक चिरलेला कोबी ४-५ वाट्या
हरबरा डाळ अर्धी वाटी,
हिरव्या मिरच्या १-२, लाल तिखट १ चमचा
मीठ, गूळ सुपारीएवढा
ओला नारळ अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे
क्रमवार मार्गदर्शन:
हरबरा डाळ ३ तास पाण्यात भिजत घालणे. फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे व हरबरा डाळ घालून १-२ वेळा वाफेवर शिजवणे. नंतर त्यात चिरलेला कोबी घालून मध्यम आचेवर शिजवणे. थोडे पाणी घालून पातेलीवर झाकण ठेवणे. ५ मिनिटांनी झाकण काढून परतणे. असे थोडे थोडे पाणी घालून ५-६ वाफा देवून शिजवणे. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व गूळ घालून परत २-३ वेळा वाफेवर शिजवणे. सगळ्यात शेवटी ओला नारळ व कोथिंबीर घालणे. या भाजीत शिजवण्यापुरतेच पाणी घालणे नाहीतर पांचट होते. ही पातळ भाजी नाही.
नुसती खायला पण छान लागते.

माहितीचा स्रोत:मामेबहीण सौ विनया गोडसे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.