सोमवार, २१ जुलै, २००८

omkar

केळ्याची पोळी वाढणी:२ जणपाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटेपाककृतीचे जिन्नस२ मध्यम आकाराची पिकलेली केळी१/२ वाटी पिठीसाखर१ १/२ वाटी कणिकतेलक्रमवार मार्गदर्शन:प्रथम केळी व्यवस्थित कुस्करून घ्यावी. त्यात पिठीसाखर, कडकडीत तेलाचे मोहन आणि बसेल तेवढी कणीक घालून पीठ मळून घ्यावे.आता ह्या मिश्रणाच्या नेहमीप्रमाणे पोळ्या लाटून घ्याव्यात। तव्यावर भाजताना तेलाचा हात लावावा.माहितीचा स्रोत:सौ. आईअधिक टीपा:खूप जास्त पिकलेल्या (अगदी काळी पडलेल्या सुद्धा) केळांचा उत्तम उपयोग करता येतो. साजूक तुपाबरोबर खायला मस्त लागतात.वरील साहित्यात साधारण ५-६ पोळ्या होतात.
नारळाच्या दुधातली बटाट्याची भाजी पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटेपाककृतीचे जिन्नसउकडलेले बटाटे ५-६फ़ोड्णी- तूप, जिरे, मोहरी ,हिन्ग, हळदचिन्च, गुळ, लाल मिरच्या, धणे पावडर, गरम मसाला, तिखट,मीठनारळाचे दुध, कोथिम्बीरक्रमवार मार्गदर्शन:सर्वप्रथम तूपात जिरे, मोहरी ,हिन्ग, हळद फ़ोडणी करा व त्यात ५-६ उकडलेले बटाटे घाला।त्यात कोळलेली चिन्च, गुळ, मीठ,धणे पावडर,गरम मसाला आणि तिखट ( बेताने जसे हवे असेल तसे) घालावे।त्यात थोडे गरम पाणी घालून चांगली शिजवून घ्यावे. चिन्च बर्यापैकी घालावी म्हणजे थोडिशी आंबट गोड चव येते भाजीला.गॅस बंद करून मगच त्यात नारळाचे दुध घालावे. चवीला मीठ राहिलेच की.वरून कोथिम्बीर पेरावी. मस्त खमंग लागते भाजी.शुद्धलेखन सुधारणेचे काम सध्या चालू असल्यामूळे चुकांबद्दल क्शमा असावीमाहितीचा स्रोत:मैत्रिण - व्रुशाली बोडस-राजवाडेअधिक टीपा:नारळाचे दुध जास्त गरम होउ देऊ नये नाहीतर दुध फुटते।
खजुराची बर्फ़ी लागणारा वेळ:३० मिनिटेपाककृतीचे जिन्नस२० खजुर८-१० बदाम८-१० काजू१०-१२ बेदाणे४ मोठे चमचे- डिंक (तळलेला)२- मोठे चमचे - साजुक तूपचांदीचा वर्खक्रमवार मार्गदर्शन:१. कढईत तूप घालून त्यात बदामाचे काप परतून बाजूला काढून घ्यावेत.२. नंतर त्याच तुपात खजुराचे तुकडे परतून घ्यावेत.३. एका भांड्यात परतलेले बदामाचे काप, खजुराचे तुकडे, काजूचे तुकडे, बेदाणे व टळून कुस्करलेला डिंक एकत्र करून छान मळून घ्यावे.४. तयार मिश्रणाला लांबट आकार देऊन वड्या पाडाव्या अथवा आवडी प्रमाणे आकार द्यावा.५. ह्या वड्या २० ते २५ मिनिटे फ्रीज मध्ये सेट कराव्या.६. तयार वड्यांना चांदीचा वर्ख लावून सजवावे.माहितीचा स्रोत:सुनिल बर्वे- आम्ही सारे खवय्ये- झी मराठीअधिक टीपा:हा पदार्थ उपवासाला तसेच मधुमेह रुग्णान्ना चालतो.
खजूर केक पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटेपाककृतीचे जिन्नसखजूर १ कप, २ वाट्या मैदा, १ कप साखर, १ कप रिफाईंड तेल१ १/२ कप दूध, १ चमचा सोडा , चिमूटभर मीठ व १ चमचा व्हॅनिला इसेन्सक्रमवार मार्गदर्शन:एक कप दुधात बिनबियांचा खजूर अर्धा तास भिजत ठेवा।मैदा, मीठ व सोडा एकत्र चाळून घ्या.केकपत्राला तेल लावून ठेवा. एका भांड्यात तेल व पिठीसाखर फेटून घ्या त्यात दुधात भिजवलेला खजूर घालून २ मि. फेटा. त्यात थोडा-थोडा मैदा टाकून मिसळत जा. त्यात उरलेलं दूध घालून १ मि. फेटा. केकपात्रात मिश्रण ओतून ६०% पॉवर (५४०) १० मि.अतिसुक्ष्मलहर भट्टीत भाजून घ्या. किंवा आधी गरम केलेल्या ओव्हन मध्ये १८० डिग्री तापमानावर ३० मि. बेक करा.माहितीचा स्रोत:माझी बहीण रंजनाअधिक टीपा:खास शाकाहारी केक। आपल्या आवडीप्रमाणे आयसिंग करुन सजवा।
वासंतिक पेय पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटेपाककृतीचे जिन्नस५,६ कैर्‍यासाधारण ३ वाट्या साखर (कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे)मीठ,केशर,वेलदोडेक्रमवार मार्गदर्शन:प्रकार-१कैर्‍या उकडून घ्याव्यात। गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो. उन्हातान्हातून घरी आल्यावर त्यातील २ चमचे बलक एका पेल्यात घेऊन थंड पाणी घालावे व चांगले ढवळावे आणि आस्वाद घेत प्यावे.प्रकार-२साहित्य वरील प्रमाणेच.कैर्‍या किसाव्यात व थोड्या पाण्यात कोळाव्यात. हे पाणी गाळून घ्यावे.त्यात वेलदोडेपूड,केशर, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.हे पाणी बाटलीत भरून ४,५ दिवस ठेवता येते व पन्हे प्यायचे असेल तेव्हा बाटली चांगली हलवून त्यातील पाव ते अर्धा पेला अर्क घालावा. उरलेला पेला पाणी घालावे, ढवळले की पन्हे तयार!माहितीचा स्रोत:सौ‌.आई.अधिक टीपा:१.साखरेऐवजी गूळही घालता येईल.गूळाच्या पन्ह्याला एक वेगळाच स्वाद असतो तो बरेच जणांना आवडतो.२.पाण्याऐवजी सोडा घातला तरी मस्त पन्हे तयार होते. कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही त्यांना हे पन्हे जास्त आवडते
कमी तेलाचे पराठें पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटेपाककृतीचे जिन्नसमेथी/पालक/गाजर/ज्याचे पराठें करायचे असतील तें,३ वाट्या कणीक,मीठ, तिखट, १० लसूण पाकळ्या, २ चमचें तेल,क्रमवार मार्गदर्शन:मेथी/पालक/गाजर किंवा ज्याचेही पराठें करायचे असतील तें बारीक चिरून कढईत वाफवावें। ह्यात मीठ, तिखट चवी प्रमाणे आणि लसणी चे वाटण घालावे. मिश्रण गरम असतानाच त्यात कणीक घालावी आणि चमच्याने छान एकजीव करावे.मिश्रण थंड झाल्यावर हे कणकी च्या पीठा प्रमाणे मळून घ्यावे. याच्या लाट्या करून पराठे लाटावे आणि शक्य तेव्हढ्या कमी तेला वर भाजावे. हे पराठे भाजतानां एका पराठ्या साठी २ थेंब तेल सुद्धा पुरतं.माहितीचा स्रोत:माझी नणंदअधिक टीपा:वजन कमी करणार्यां साठी उत्तम। यांच पद्धती ने मुळा, फ़्लॉवर चे पण पराठे होतात. मात्र मग ह्यात डाळीचे पीठ, कोथिंबीर हे पण घालावे.
खजूर-बदाम-काजू मिल्क शेक रोहिणी शनि, १०/०२/२००७ - २३:१५.
वाढणी:२ जणपाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटेपाककृतीचे जिन्नसखजूर १२बदामाची पूड २ मुठीकाजू पूड १ मूठदूध २ कपसाखर २ चमचे / आवडीनुसारक्रमवार मार्गदर्शन:एक कप थंडगार दूधामधे खजूर २-३ तास भिजत घालणे। नंतर ते मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक करणे. नंतर परत १ कप दूध घालणे. बदाम व काजू पूड घालणे. व आवडीनुसार साखर घालून परत एकदा बारीक करणे. असे हे दाट मिल्क शेक तयार होईल. पातळ/दाट हवे त्याप्रमाणे दूध घालणे.
मोगरा सरबत साहित्य :पाव किलो मोगर्‍याच्या ताज्या कळ्या,५ लिटर पाणी ,अर्धा किलो साखर , चिमूटभर मीठ।कॄति :मोगर्‍याच्या कळ्या थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे।५ लिटर पाणी उकळण्यास ठेवा , चांगले उकळले की त्यात साखर घालून अजुन २० मि. उकळवावे.चिमूटभर मीठ घालून पाणी गाळून घ्यावे.पूर्णं थंड झाल्यावर त्यात मोगर्‍याच्या कळ्या घालून झाकण ठेवून २ तास ठेवावे.परत एकदा पाणी ५ मि. उकळवून घ्यावे ( फुलं काढून घेउन )थंड झाल्यावर परत एकदा फुलं त्यामधे घालून अजून २ तास ठेवावे.नंतर फुलं काढून टाकावी आणि गाळून एका बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवावे.सर्व्ह करते वेळेस १ : २ भाग थंड पाणी मिक्स करून सर्व्ह करावे।
नेपाळी बटाटा पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटेपाककृतीचे जिन्नस४,५ बटाटे,२ टे-स्पून तेल,हळद१/२ चहाचा चमचामिरपूड १ चहाचा चमचा,मीठ चवीनुसार,कोथिंबीरक्रमवार मार्गदर्शन:बटाटे साले काढून लांब चिरा(फ्रेंच फ्राइज सारखे).तेल तापत टाका,त्यात हळद घाला,बटाटे घाला,मिरपूड घाला‍,परता, झाकण ठेवा,बटाटे शिजत आले की मीठ घाला.अधून मधून परता नाहीतर बटाटा खाली लागतो.कोथिंबीर घालून सजवा.पोळी/फुलक्यांबरोबर खा.टीपा:मी २ टे-स्पून लिहिले आहे पण या भाजीला तेल थोडे जास्त लागते।भाजी झाली की कढईतून दुसऱ्या वाडग्यात काढून उरलेल्या तेलात आमटी होते ,इतके तेल लागते,नाहीतर भाजी खाली लागते। नॉनस्टीक मध्ये कमी तेल लागेल
गुलखंड पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटेपाककृतीचे जिन्नसस्पाइझ क्वार्क ४०%फॅटवाला /चक्का ५००ग्राम,२५०/३०० ग्राम साखर,१ टेबल स्पून गुलकंद,बदाम/काजूतुकडे १टेबल स्पून(वैकल्पिक)क्रमवार मार्गदर्शन:इथे speisequark नावाचे जे दही मिळते त्याला आम्ही "जर्मन चक्का" असे नांव दिले आहे!स्पाईझ क्वार्क मध्ये साखर मिसळा,बदाम/काजू तुकडे घाला.गुलकंद घाला‌‌. गुलखंड तयार!पोळी/पुरी बरोबर खा.वेगळी चव छान लागते.माहितीचा स्रोत:नवराअधिक टीपा:काल दसरा होता.म्हणून श्रीखंड करायचे ठरवले.दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन घरात रहायला गेलो‌. चोहीकडे सामान!त्यातून हवे ते वेळेवर मिळाले तर मग आणि काय हवे? जायफळ/वेलदोडे कोणत्या बरणीत/डब्यात आहेत हे १०,१२ डबे उचकून पण सापडेनात म्हणून मी वैतागले तर इकडे दिनेशने गुलकंदाच्या बरणीतून(ती कुठून मिळाली त्याला,कुणास ठाऊक?) गुलकंद काढून त्यात घातला!आणि गुलखंड असे बारसे करुन आम्ही खाल्ले