शनिवार, २३ ऑगस्ट, २००८

श्रावण बिर्याणी

माझी खास मैत्रिण गेल्यावर्षी Deuthchland(Germany)ला गेली होती श्रावणाच्य सुमारास. पण श्रावणांत कांदा लसुण खात नसल्याने काय स्पेशल करायचे हा प्रश्नच होता आणि म्हणुन एक प्रयोग म्हणुन ह्या " श्रावण बिर्याणी" चा शोध मी लावला. आता श्रावण महिना सुरुन होणार म्हणजे कांदा-लसुण बंद. म्हणुन ही माझी सोज्वळ पाकक्रिया देत आहे.साहित्यःतयार बासमतीचा भात.( भात शिजवतना आधी तुपावर परतुन घ्यावा त्यात थोडा लिम्बु रस, मीठ (भातापुरते) व अ़ख्खा गरम मसाला घालावा)भाज्या :- पनिर,अर्ध्या वाफवलेल्या( फरसबी,गाजर,फ्लॉवर,मटार)मसाल्यासाठी:२ मोठे टोमॅटो- ब्लांच करुन्-उकळीच्या पाण्यात टाकुन सालं व बिया काढुन टाकायचे.भिजवलेली खसखस- १+१/२ चमचाकाजु ५,६ भिजवुन१/२ इंच आलं२ चमचा भरुन ताजा खवालाल तिखटएकत्र वाटुन घ्यावे,मीठ, सा़खरकढीपत्ता, तमालपत्र, वेलची- फोडणी साठीकेशर मिश्रित दुध, तळ्लेले काजु,आणि बटाट्याच्य सळई, बेदाणे,चेरी-सजावटीसाठी
क्रुती-प्रथम तुपात कढीपत्ता, तमालपत्र, वेलची घालवी नंतर वाटलेला मसाला पक्का परतुन घ्यावा. मग त्यात भाज्या (फरसबी,गाजर,फ्लॉवर,मटार) व पनिर टाकुन छान परतुन घ्यावे. व त्यात थोडे पाणी व मीठ (चवीप्रमाणे)व चिमुटभर सा़खर घालुन एक उकळी आणवी. दाटसर रस्सा ठेवावा.एका पातेल्याला तुप लावुन घ्यावे. त्यात एक भाताचा थर लावावा मग एक भाजीचा लावावा. त्यावर थोडे तळ्लेले काजु,आणि बटाट्याच्य सळई पसरवावेत,व केशर मिश्रित दुध शिंपडावे. असे भात आणि भाजी चे थर लावत जावे.सर्वात शेवटी भाताच्या थरावर थोडा केशर मिश्रित दुधात थोडा प्लेन भात कालवुन तो थर सर्वात शेवटी द्यावा. व नंतर तळ्लेले काजु,आणि बटाट्याच्य सळई, बेदाणे,चेरी-सजावट करावी. व नंतर मध्यभागी भातात एक खळ्गे करुन त्यात एक वाटी ठेवावी. त्यात रसरशीत फुलवलेले दोन लालबुंद निखारे ठेवावेत्.त्यावर थोडे तुप सोडुन लगेच झाकण ठेवुन, कणिक लावुन छान दम द्यावा,आणि नंतर गरम गरम "श्रावण बिर्याण"" पेश करावी.