गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

रव्याच्या वड्या

साहित्य- १ वाटी बारीक रवा,१ वाटी साजूक तूप,३ वाट्या दूध,३. ५ ते ४ वाट्या साखर,वेलचीपूड, केशर
कृती- रवा थोडा भाजून घेणे. थंड झाला की बाकी सर्व जिन्नस त्यात मिसळणे. एका कढईत सर्व मिश्रण आटवत ठेवणे. मिश्रण उडते, त्यामुळे ढवळताना काळजी घेणे. घट्ट झाले की लाटून किवा थापून वड्या पाडणे.