गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

झटपट धिरडी

जिन्नस
१ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, अर्धी वाटी बेसन, १ वाटी बारीक चिरलेला अथवा किसलेला कांदा,
दोन बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेल्या २-३ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून आल्याची पेस्ट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ टिस्पून जिरं, चवीनुसार मीठ, तेल.
मार्गदर्शन
तेल वगळता वरील सर्व पदार्थ एकत्र करून पाणी घालून सरसरीत भिजवावे. त्यात २ चमचे कच्चे तेल घालावे. नॉनस्टिक तव्यावर फुलक्याच्या आकाराची जरा जाडसर धिरडी घालावीत. झटपट आणि चमचमीत नाश्ता तयार.