गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

साटोर्‍या

प्राजुच्या मागणीवरून ही कृती देत आहे.साहित्य- १ वाटी रवा,१ वाटी मैदा,१.५ वाटी अगदी बारीक रवा,१ वाटी खवा, १/४ वाटी खसखस,२ वाट्या पिठीसाखर, वेलचीपूड,दूध,तूप,तांदळाची पिठीकृती- १ वाटी रवा+मैदा तूपाचे मोहन घालून दुधात घट्ट भिजवा.बारीक रवा तूपावर खमंग भाजून घ्या.खवाही भाजून घ्या. खसखस भाजून व कुटून घ्या. रवा,खवा,खसखस,पिठीसाखर,वेलचीपूड एकत्र करा.मळून लहान गोळे करा.भिजवलेला रवा+मैदा कुटून किवा फूड प्रोसेसर मधून काढून घ्या,ह्या कणकेचे पुरीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करा आणि पुरणपोळीत जसे पुरण भरतो त्याप्रमाणे खव्याचे गोळे भरून तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने लाटा.तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद भाजा. गार करा आणि नंतर तुपात किवा रिफाईंड तेलात तळा.(मी तव्यावरच तूप टाकून पराठ्यांसारख्या भाजते आणि थोड्याशा क्यालरी आणि कष्ट वाचवते.)