गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

उपासाची भजी

साहित्य :४/६ अळकुड्या ; शिंगाडा पीठ ; हिरव्या मिरचीचा ठेचा ; मीठ ; जीरा पावडर ; पाणी ; तळणाकरीता तूप.
कृती :अळकुड्या सोलून त्याचे त्रिकोणी तुकडे करून घ्यावे.ते लगेच मीठाच्या पाण्यात ठेवावे नाही तर बुळबुळीत होतात.शिंगाडयाच्या पीठात हिरव्या मिरचीचा ठेचा , चवीपुरते मीठ आणि जीरा पावडर घालून जरा पातळसरच भिजवावे.तूप तापवून मंद आचेवर अळकुड्यांचे तुकडे पीठामधे बुडवून सोडावे.चांगला लालसर रंग येईपर्यंत तळावे.गरम गरम खाण्यातच मजा आहे.अळकुड्या शिजवून घेतल्या तरी चालतील पण मग त्याचे काप करून त्याला पीठ जरा जाड भिजवावे लागेल.