गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

कणकेचे लाडू

जिन्नस
२ वाट्या कणिक,१.५ वाटी पीठीसाखर,१ वाटी साजूक तूप
वेलची पूड,बेदाणे,बदामाचे काप
मार्गदर्शन
कणकेत १,२ चमचे तूप घालून सूक्ष्मलहरींवर ८०० वॅट वर २ मिनिटे गरम करावे,बाहेर काढून चांगले एकत्र करावे.परत थोडे तूप घालून सुक्ष्मलहरीवर २ मिनिटे ठेवावे,बाहेर काढून पीठ सारखे करावे,असे ४,५ वेळा करावे.कणिक भाजल्याचा खमंग वास आला की कोमट होऊ द्यावे,त्यात पीठीसाखर,वेलची पूड,बदाम,बेदाणे घालून सारखे करावे,हवी असल्यास अजून साखर घालावी व लाडू वळावेत.
टीपा
याच प्रमाणे बेसन,मैदा,नाचणीचे पीठ,साबुदाणा पीठ इ. चे लाडू करता येतात.ही पीठे खमंग भाजायला खूप वेळ आणि उर्जा लागते,त्याला मायक्रोवेवचा हा पर्याय उत्तम आहे.मैद्याचे लाडूही छान होतात!