गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

बरटा

हे एक उपवासाला चालणारे लिंबाचे झटपट लोणचे आहे. माझी आई हे लोणचे छान करते.
साहित्यः एक लिंबू, गूळ, लाल तिखट, मीठ, भाजून केलेली जिरेपूड, आवडत असल्यास दाण्याचे कूट.
कृती: लिंबू चिरून कुकरमध्ये उकडून घ्यावे. उकडताना दोन चमचे पाणी घालावे (जास्त नको). उकडलेल्या लिंबाच्या बिया काढून हाताने कुस्करून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे गूळ, मीठ, लाल तिखट, जिरेपूड घालून कालवावे. लिंबू उकडल्यावरही त्यात थोडा कडसरपणा असतोच, तो ज्याना आवडत नसेल त्यांनी छोटा चमचा दाण्याचे कूट घालावे.
साबूदाण्याची खिचडी / वडे, वर्‍याचे तांदूळ याबरोबर बरटा चांगला लागतो. एरवी पोळी किंवा ब्रेडबरोबरही छान तोंडीलावणे आहे.
(अवांतर - ताजा केलेला बरटा आत्ताच संपल्याने चित्र चढवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व! पुढच्या वेळी आठवणीने चित्र देईन.)