गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

चहा

दोस्तानो या वीकान्तासाठीरेसीपी कोठे हे लिहायच्या हे कळाले नाही. पण मला वाटते की रेसीपी हा प्रकार आस्वादात्मक या प्रकारत मोडत असाव्यात्.म्हणुन येथे लिहीत आहे.( रसास्वाद ..........)ललित लेख, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक लेख, कथा, समिक्षण, अनुभव आणि आस्वादात्मक लेख, इत्यादींसारखे सर्व बहुरंगी बहुढंगी लेखन या भागात करावे ही विनंती!
आपण नेहमी ऐकत असतो की "बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणु नये"या वीकान्ता साठी चहा चे हे दोन वेगळे प्रकार्........पुरुषांसाठी आणि बायकांसाठी ही......काहवा....हा चहा कश्मिर मध्ये प्रचलीत आहे. मस्त थन्डी , मोकळी हवा , आणि सोबत निवान्त पण (गोव्याकडे "सुशेगाद" म्हणतात तेव्हढा निवान्त पणा हा चहा पिण्यासाठी अत्यावष्यक घटक. मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर अथवा शम्मी कपूर ची गाणी असतील तर सोने पे सुहागा)हा चहा मजेत चाखत माखत प्यायचा..उगाच घिसड घाई चालत नाही.असो. यातील घटक : ग्रीन चहा( नसल्यास काळाही चालेल) ,३ /४लवन्ग , वेल्दोडे, केसर , दालचीनी ,बारीक किसलेला बदाम,मध, मीठ,लिंबु१) प्रथम ३ कप पाणी ; लवन्गा , दालचीनी टाकुन उकळत ठेवावे. वेलदोडे ठेचुन त्यात टाकावे२) केसर थोडे पाण्यात भिजवुन ठेवावे.३) पाणी उकळल्यावर त्यात गाळणीत २ चमचे चहा पत्ती आणी ठेवुन गाळण चहा भिजेल इतपत पाण्यात बुडवुन ठेवावी.४) ३ ते ५ मिनीटानी चहाचा ( पाण्याचा)रंग सोनेरी झाल्यावर गाळण बाजुला काढावी. जास्त कडक हवा असल्यास जास्त वेळ ठेवावी५) या सोनेरी चहामधे ४ ते ५ चमचे मध टाकावा.( गोडी वाढवु शकता)६)किन्चीत मीठ टाकावे आवडत असल्यास थोडेसे लिंबु पिळावे७)केसर मिश्रीत पाणी टाकावे.दोन चमचेमस्त मोठ्या कपात गरम गरम असतानाच भरुन द्यावे७) वाढताना त्या हवे असल्यास किसलेला बदाम वरुन टाकावा.मस्त मंद आवाजात बासरी + सन्तूर लावुन झकास रिलॅक्स मधे काहवा प्या...* काही जण हा चहा थंड ही पितात. त्यावेळी त्यात स्मिर्नोफ व्होडका चा एखादा चमचा टाकल्यास हरकत नाही.