गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

हलीम

श्रावण संपत येतोय। पुढील आठवड्यात गणरायांचे आगमन. तेव्हा येत्या वीकांताचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी ही एक पाककृती....
साहित्यमटण : अर्धा किलो शक्यतो बोकडाचे. अगदीच शक्य नसल्यास lamb चालेल परंतु बोनलेस घेऊ नये.गहू : पाव किलोधने पावडर : एक चमचाजीरे पावडर : एक चमचादालचिनी पावडर : अर्धा चमचालवंग पावडर : अर्धा चमचालाल तिखट : सहा चमचेआले-लसूण पेस्ट : दोन चमचेदही : चार चमचेकांदे : पाचहिरव्या मिरच्या : दोन-तीनचिरलेली कोथिंबीर : पाव वाटीतेल : जरुरीपुरतेतूप : जरुरीपुरतेमीठ : जरुरीपुरतेपाणी : भरपूर
पूर्वतयारी१) किमान एक दिवस (२४ तास) आधी गहू भिजत घालावेत.२) गहू १०-१२ तास भिजल्यानंतर सावलीत वाळत घालावेत.३) गहू वाळले की भरड कुटून घ्यावेत. भरड राहणे महत्वाचे पार पीठ करू नये.४) मटणाला धने, जीरे, दालचिनी व लवंग पावडर, तिखट, आले-लसूण पेस्ट तसेच दही लावून किमान एक तास मुरवत ठेवावे.५) एक कांदा बारीक तर उरलेले चार कांदे उभे चिरून घ्यावेत.६) मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.
कृती१) तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.२) त्यात मुरवलेले मटण आणि पाणी घालून तासभर शिजवत ठेवावे.३) मधल्या काळात उभे चिरलेले कांदे तुपात तळून घ्यावेत.४) तासाभरात मटण शिजले की त्यात कुटलेले गहू आणि पाणी घालून सुमारे अडीच तास शिजवत ठेवावे. अधुन-मधून पाणी घालून ढवळत रहावे.५) मटणाचा पूर्ण लगदा झाला की चवीपुरते मीठ घालून शिजवणे थांबवावे.६) वर तुपात तळलेला कांदा, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर भुरभुरावी.
टीप१) वरील प्रमाण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरावे.२) सोबत रक्त वारुणीची संगत असल्यास उत्तम!३) पुढील महिन्याच्या मध्यावर रमजान येतोय. मुंबईत राहणार्‍यांनी निदान एखाद्या रात्रीतरी महंमद अली रोडवर चक्कर टाकावी, हा आग्रहाचा (आणि फुकटचा) सल्ला!