गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

नारळाच्या वड्या

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मी बाहेरुन(चितळे,काका हलवाई,इ.) काही न आणता घरीच गोड काहीतरी बनवायचे ठरवले.माझी ही पहीलीच गोड पा.कृ. आहे. तरी ह्यात काही बदल करुन अजुन चांगली कशी बनवता येईल हे सांगावे.
साहीत्य : नारळाचा चव(खोवलेला नारळ) १ वाटी,साखर १ वाटी ,दुध(सायी सकट),वेलदोडे पुड.कृती : प्रथम नारळाचा चव आणि साखर एकत्र करुन घ्यावे त्यात सायीसकट दुध-साधारण आर्धी वाटी - घालावे.हे मिश्रण शिजवत ठेवावे. आणि हलवत रहावे नाहीतर करपते. मिश्रणाचा रंग बदलला (चॉकलेटी दिसते) आणि त्याचा गोळा तयार झाला कीत्यात वेलदोडा पुड घालावी (लहान अर्धा चमचा). हे शिजलेले मिश्रण तुप लावलेल्या ताटलीत पसरावे.ह्या झाल्या नारळाच्या वड्या तयार!!!