गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

निनावं

साहित्य-तीन वाट्या बेसन पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी तांदूळ पीठ, ३ वाट्या किसलेला गुळ्,दोन मोठे चमचे साजुक तूप, एका नारळाचे दुध, वेलची-जायफळ पूड, मीठ ,काजू.कृती-प्रथम सर्व पीठे एकत्र करुन तूपात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावीत्.गुठ्ळ्या होवु न देता. गूळ नारळाच्या दुधात विरघळवुन त्याचे सरसरीत मिश्रण करुन घ्यावे. पीठ गार झाले कि या मिश्रणात टाकुन वरुन वेलची-जायफळ पूड, मीठ ,काजु टाकावे.मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत घाटावे. मिश्रण घट्ट झाले की प्री-हीटेड ओव्हन मधे १५० डिग्री वर १२/१५ मिनिटे बेक करावे.बाहेर काढल्यावर १५ मिनिटानी त्याच्या चौकोनी वड्या पाडाव्या.इतर-हा एक पारंपारीक सी के पी पदार्थ आहे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी हा आवर्जुन केला जातो. याचं नाव निनावं असण्याच मजेशीर कारण संगितलं जातं की- सी के पी लोक खवय्ये समजले जातात. खास सामिष्-निरामिष पदार्थ करण्यात पुढे असतात्.या खाद्यसंस्कृती त इतके पदार्थ आहेत, की या पदार्थाला नावच उरल नसावं -म्हणुन हे निनावं.