गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

डब्यातला बटाटा

साहित्य.बटाट्यच्या काचर्या एकदम पातळ चिरलेल्याआलं, मिरची , आणि जिरे एकत्र वाटुन१ डबामीठ, साखर चवी प्रमाणेनारळ, कोथिंबीरलिंबु( आवडत असल्यास्..मला आवडते म्हणुन मी घालते ते आवश्यक आहे अस नाही)पाव चमचा तुप.
क्रुती:-१ घट्ट झाकणाचा डबा घ्या त्याला पाव चमचा तुप लावुन घ्या.कोथिंबीर, लिंबु सोडुन सर्वा पदार्था एकत्र करावेत आणि डब्याला झाकण लावुन कुकर मध्ये ३ शिट्या काढा. बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबु पिळुन खा.
हा पदार्थ कमी उष्मांकाचे पदार्थ खाणर्यासाठी छान आहे.आणि चटकन होणारा ही आहे.