गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

पोलिश घावन

ही पाककृती साभार एका पोलिश मित्राकडून!
साहित्य: २ मोठ्ठे बटाटे, १ मोठ्ठा कांदा, अर्धी वाटी कणीक, १ अंडं, तिखट, मीठ, पाणी गरजेनुसार, आणि भरपूरसं तेल
कृती: प्रथम बटाटे आणि कांदे किसून घ्यावे. त्यात अंडं फेटून टाका. त्यात कणीक घाला. (साधारण घावनांच्या पीठाप्रमाणे याची घनता/viscocity असू देत. त्यामुळे जरुरीनुसार पाणी/कणीक घाला.) त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट, आवडत असल्यास मिरी घाला.थोड्याशा खोलगट तव्यावर तेल तापलं कि त्यात हे मिश्रण घावनांप्रमाणे ओतून दोन्ही बाजूंनी शिजवा. कडा बय्रापैकी कुरकुरीत होतात.याच्याबरोबर दही (/sour cream) चांगलं लागतं. आवडत असतील तर ग्रिल्ड अळंबी (मश्रूम) पण याच्याबरोबर घ्या.आणि हादडा!
अवांतरः म्हणे पोलंडमधे हा एकदम प्रसिद्ध स्नॅक आयटम आहे.