गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)

कोल्हापूरची खाद्य संस्क्रुती आहारशास्त्र, आरोग्यशास्त्रातील निकषापेक्षा एक वेगळी संस्क्रुती."ठसका", "झटका","भुरका" ही खाद्य संस्क्रुतीची वैशिष्ठ्य. या वैशिष्ट्यांमागे तिखटातीलही एक गोडवा आहे. तो असा
पांढरा रस्सासाहित्यः १/२ किलो मटण२ टे.स्पून तीळ१ वाटी ओले खोबरे६/७ लसूण पाकळ्या१ इंच आले४ वेलदोडे७/८ काळी मिरी२ टी.स्पून तूपमीठ चवीनुसार
१.प्रथम मीठ, आले, लसूण, थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.२.तीळ बारीक वाटून घ्यावेत.३.मिक्सरमधे थोडे पाणी घालून खोबर्याचे दूध काढून घ्यावे.४.नंतर तूपाची फोडणी करून त्यात मिरी, वेलदोडे टाकवेत. मटणाचे सूप घालावे.५नंतर खोबर्याचे दूध घालावे.६. हवे असल्यास मीठ घालावे व चांगली उकळी आणावी.
टीप: १.काही वेळा फोडणीत दालचिनीचे तुकडे टाकतात.२.पांढरा रस्सा पातळ सूपप्रमाणे ठेवावा किंवा रस्सा थोडा वाटलेले ओले खोबरे लावून ग्रेव्हीप्रमाणे दाट करावा.
*********************************************************************तांबडा रस्सा:साहित्यः१ किलो मटण२ टी.स्पून मीठ१/४ टी.स्पून हळद९/१० लसूण पाकळ्या१इंच आलेकोथिंबीर४ कांदे१ टोंमॅटो१ वाटी तेल१ टे.स्पून लाल तिखट
मसाला:२ टे.स्पून तीळ१ टे.स्पून खसखस४/५ लवंगा४/५ दालचिनीचे तुकडे४/५ काळी मिरी१ टी,स्पून धणे,जिरे पूड२ टे.स्पून ओले खोबरे२ टे.स्पून सुखे खोबरे४ वेलदोडे
क्रुती १
१.निम्मे आले -लसूण, कोथिंबीर, हळद, मीठ घालून मटण चांगले शिजवून घ्यावे.२.वरील सर्व मसाला थोड्या तेलात भाजून ,मिक्सरमधे बारीक वाटून घ्यावा.३.मटण शिजल्यानंतर एका पातेल्यात तेल घालून उरलेले आले-लसूण, कांद्याची फोडणी घालून तिखट वबारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगले परतावे.४.नंतर बारीक केलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत भाजावा.५.नंतर शिजलेले मटण घालावे आणि वरून पाणी गरम करून घालावे.६.रस्सा पातळ पाहिजे. चांगली उकळी येऊ द्यावी.७. वरून तूप घालावे व कोथिंबीर घालावी.
क्रुती २१.प्रथम मटणाला निम्मे आले,लसूण, थोडी हळ्द, १/२ च. तिखट चोळून लावावे व झाकून बाजूला ठेवावे.२.एका पातेल्यात थोड्या तेलात वरील सर्व मसाला भाजून, मिक्सरमधे बारीक वाटून घ्यावा.३.त्याच पातेल्यात कांदा भाजून घ्यावा. मिक्सरमधे बारीक वाटावा.४.टोमॅटो बारीक चिरावेत.५. मोठ्या पातेल्यात तेल गरम करून वाटलेला कांदा तेल सुटेपर्यंत परतावा. नंतर त्यात उरलेले आले, लसूण पेस्ट. तिखट, हळद घालून परतावे. नंतर बाजूला ठेवलेले मटण घालून परतावे. सर्व मसाला मटणाला लागला पाहिजे.चवीनुसार मीठ व टोमॅटो घालून परतावे.६.मटण खमंग परतले की, त्यात गरम पाणी घालून ढवळावे.७.नंतर प्रेशर कुकर मधे घालून ३ शिट्या कराव्यात. थंड झाल्यावर मटण व्यवस्थित शिजले की नाही ते पाहावे.