गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

वेज फ्राय

साहित्य :३ बटाटे, १ पाव भेंडी, ५ मोठ्या मिरच्या, ८-९ पाकळ्या लसून, अर्धी वाटी मटार किंवा चवडीच्या शेन्गाचे दाणे, १/२ च. जिरे, १/२ मोहरी, हळ्द, मीठ, कोथिंबिर , तेल ३ टि.स्पून, मिर्चि पावडर चवीपुरता, १/२ गरम मसाला इ.
कृती : बटाट्याचे सोलून पातळ पातळ काप करा (जास्त पातळ नाही किंवा जाड ही नाही... जे तेलात न करपता लगेच शिजतिल) . भेंडी ला मधुन चिर देवुन २ इंचाचे कापुन तूक्डे करा. मिरचिला पण भेंडी सारखेच चिरा... लसुण बारिक चिरुन घ्या...एका कढईत तेल तापवुन.जिरे-मोहरी घाला, ते तड्कले कि लसुण घाला, मग चिरलेल्या मिरचिचे तुकडे घाला, कापलेला बटाटा घाला... मटर घाला... हे सगळे अर्धवट शिजायला आल्यावर, त्यात मिरची पावडर, हळ्द, गरम मसाला घालून परतवा.मग भेंडीचे काप टाका, चवीनुसार मीठ घाला आणि सारखे भाजी ढवळत रहा, जो पर्यन्त भेंडी निट शिजत नाही . भाजी सारखी हलवत राहिल्यास भाजी कुरकुरीत होते. जेवायच्याआधी कोथिंबिर कापुन घाला......आणि .....टिप : पहिला घास घेताना "चटोरी वैशू" ची आठ्वण कढायला विसरु नका?