गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

जिलेबी

जिन्नस
३ वाटी मैदा
१ वाटी उडीद डाळ
१ कप साखर
१ चिमुट केशर
२ चिमटी वेलदोडा पुड
२ चमचे लिंबाचा रस
मार्गदर्शन
उडीद डाळ ४-५ तास भिजवून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी, मग त्यात मैदा मिसळवा.पिठात एक पण गुठळी नको म्हणून पिठातून ब्लेंडर फिरवून घ्यावे. इडली पिठासारखे भिजवून ६-७ तास उबेला ठेवावे.आता सॉसच्या बाटलीत पीठ भरून गरम तेलात जिलेब्या घालाव्यात आणि थोड्या ब्राऊन रंगावर तळून लगेच पाकात टाकाव्यात. ५ मिनीटांनी काढून घ्याव्यात. पाकाची कृती:१ कप साखरेत १/२ कप पाणी, केशर, लिंबाचा रस आणि वेलदोडा पुड घालून उकळी आणावी आणि गस बंद करावा.
टीपा
गरमा गरम खाव्यात :)