गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

झटपट घावन

साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ.कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे.तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते.
टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.