गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

प्लम सुफले

साहित्य- २५० ग्राम डब्यातील प्लम,१ चहाचा चमचा बटर,२ अंडी,२ टे‌बल स्पून मैदा१.५ चहाचा चमचा लिंबाची साल किसून,३ चहाचे चमचे वॅनिला अर्क किवा २ पाकिटे वॅनिला साखर१५० ग्राम स्पाइझक्वार्क/चक्का/केफिर चीज/क्रीम चीज यापैकी जे उपलब्ध असेल ते.१ टेबल स्पून साखर,१ चिमूट मीठकृती- बेकिंगट्रे/डिशला बटर लावून घेणे.प्लम्सचे अर्धे तुकडे करणे आणि त्यांना काट्याने टोचे मारणे व ते बेकिंग ट्रे मध्ये लावून घेणे.अंडी फोडून पांढरे व पिवळे वेगळे करणे.एका वाडग्यात अंड्यातील पांढरे,१ चिमूट मीठ,वॅनिला अर्क/साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम बनला पाहिजे.(याला आयश्ने *म्हणतात.)भरपूर फेटावे लागते.दुसर्‍या वाडग्यात क्वार्क,अंड्यातील पिवळा बलक,मैदा,लिंबाची किसलेली साल,साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने चांगले फेटणे.या मिश्रणात वरील आयश्ने घालणे , न फेटता फक्त एकत्र करणे व हे मिश्रण बेकिंग डिशमधील प्लम्स वर घालणे.प्रिहिटेड अवन मध्ये २५-२७ मिनिटे १८०अंश से.वर बेक करणे.गरम/गार/कोमट जसे हवे तसे खाणे.*आयश्ने: आय=अंडे, श्ने= हिम