गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

वाटली डाळ

जिन्नस
हरभरा डाळ - २ वाट्या
फोडणीचे साहित्य मोहरी, जीरे, हिंग, हळद, तेल अर्धी वाटी
आले - १ इंच, कढीलींब ७-८ पाने
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पाउण वाटी
साखर, मीठ, अर्धा चमचा लाल तिखट
हिरव्या मिरच्या - ४ -५ (तिखटपणावर अवलंबून), १ लिंबाचा रस
मार्गदर्शन
१. प्रथम हरभरा डाळ नीट निवडून धुवून भिजत घालावी. साधारण ३ ते ४ तास झाले व ती चांगली भिजली की निथळून घ्यावी. चांगली भिजल्याची खुण म्हणजे डाळ दातानी नीट चावता यायला हवी.
२. निथळलेली डाळ मिक्सर वरून भरड वाटून घेणे. फार मउ करायची नाही.
३. कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कढीलींब घालून खमंग फोडणी करा. आता भरडून घेतलेली डाळ घाला व परता. डाळ कोरडी होईपर्यंत खमंग परता.झाकण ठेवून एक वाफ द्यावी, त्यनंतर ओला खवलेला नारळ घालून परतावे. त्यात साखर, मीठ, आले ,अर्धा चमचा लाल तिखट ,हळद चवीनुसार घालून २ मिनिटे वाफ द्यावी. आता आच बंद करावी.
४. चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आवडीप्रमाणे घालून खायला द्यावे. परत वरती ओले खोबरे भुरभुरावे.
टीपा
पोहे,उपीट सारखे करून कंटाळा येतो. चव बदल म्हणून आम्ही कोरडी डाळ करतो . नुसती खायला ही मस्त लागते ,पोळीशी ही खातात. पोळीशी खाताना गोड लिंबा चे लोणचे खावे.