गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

संडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)

सुरवात करत आहे मिसळीने अर्थात कोल्हपुरी.मी खाली दिल्याप्रमाणे मिसळ करते. काही सजेशन असल्यास स्वागत आहे.
कोल्हपुरी मिसळसाहित्य:३ वाट्या मोड आलेली मटकी४ उकडलेले बटाटे४ मोठे कांदे३ इंच आले१०/१२ लसूण पाकळ्या१ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ१ वाटी सुखे खोबरे२वाट्या ओले खोबरे२ टे.स्पून तीळ१ टे.स्पून गरम मसाला (किंवा ५ लवंगा, ८/१० काळे मिरे, २ इंच दालचिनी तुकडा,१ च.धने, १ च जिरे)२ टे.स्पून कांदालसूण मसाला१/२ च. हळ्द१/४ च. हिंग१ वाटी तेलचवीनुसार मीठइतर साहित्यः शेव चिवडा (मिक्स) / फरसाण, पाव (ब्रेड स्लाइस), कोथिंबीर, लिंबू
तयारी:१.प्रथम मोड आलेली मटकी भाजून, शिजवून (कुकरमध्ये), त्यातील पाणी बाजूला काढून २ च.तेलात फोडणी करूनमीठ,तिखट घालून उसळ करून घ्यावी.२.२च.तेलात हळ्द, मीठ घालून उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत.३. २ च.तेलात, २ चिरलेले कांदे,तीळ, खोबरे, लवंगा, काळे मिरे, दालचिनी ,धने, जिरे सर्व भाजून घ्यावे आणि थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटावे. आले, लसूण बारीक वाटावे.४.मिसळीचा कट करताना एका मोठ्या पातेल्यात उरलेले ३/४ वाटी तेल घेऊन त्यामध्ये हळ्द, हिंग, १ बारीक चिरलेला कांदा घालावा.५.कांदा गुलावी रंगाचा झाल्यावर त्यामध्ये २ च. कांदालसूण मसाला आणि वरील दोन्ही वाटण घालावे. कडेने तेल सुटेपर्यन्त परतावे.चवीनुसार मीठ घालावे. ५/६ कप (जमल्यास कोमट) पाणी घालावे. वरील मटकीचे बाजूला काढलेले पाणी,चिंचेचा कोळ घालावा. उकळी आणावी.
सर्व्ह करताना:एका खोलगट डिश मध्ये प्रथम मटकीची उसळ.उकडलेले बटाटेफरसाणत्यानंतर कटबारीक चिरलेला कांदा, कोथिंबीरसोबत पाव आणि लिंबाची फोड.
टीप: १. काही वेळा वेळ कमी असेल तर एकाच फोडणीत मटकीउसळ, बटाटेभाजी करु शकतो.२.चिंचेचा कोळ ऐवजी सर्व्ह करताना टोमॅटोच्या बारीक फोडी घालाव्यात.३.काही वेळा कटावरील तवंग जास्त हवा असल्यास २ च.तेल गरम करून त्यात १ च.तिखट घालून कटामध्ये घालावे.