गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

कांद्याच्या हिरव्या पुऱ्या

जिन्नस
प्रत्येकी एक वाटी तांदळाची पिठी, ज्वारीचे पीठ आणि मैदा, दिड वाटी बारीक चिरलेला पालक,
एक वाटी किसलेला कांदा, दोन टीस्पून आलं-लसूण पेस्ट, दोन टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, चवीपूरते मीठ, साखर, तळण्यासाठी तेल.
मार्गदर्शन
तिन्ही पिठे एकत्र करून त्यात पालक, कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, मीठ, साखर घालून पाव वाटी गरम तेलाचे मोहन घालावे. जरूरीपुरते गरम पाणी घालून घट्ट गोळा भिजवावा. अर्ध्या तासानंतर पुऱ्या लाटून तळाव्यात. या पु-याना सुरेख कांदा भज्यांची चव येते.
टीपा

~
(मूळ शीर्षक : ग्रीन ओनियन पुरी - प्रशासक)