गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

नारळीभात..

नारळीभाताची पाककृती अभिज्ञ ने मागितली होती। इथे माझी रेसिपी देत आहे.
साहित्य :१। १ वाटी बासमती तांदूळ.२. तूप २ टे, स्पून३. लवंगा ५-६४. वेलची ३-४५. गूळ(किसून किंवा चिरून) सव्वा वाटी६. ओल्या नारळाचा चव १ वाटी.७. ड्राय फ्रुट्स
कृती :१. प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मऊ मोकळा भात शिजवून घ्यावा. आणि तो गरम असतानाच एका तसराळ्यात पसरून ठेवावा.. पसरताना त्याची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.२. एका जाड बूडाच्या पातेल्यात तूप घालावे. ते गरम झाले की , त्यात लवंगा आणि वेलची घालावी. त्यातच काजूचे तुकडे, बदामाचे काप इ. सुका मेवा परतून घ्यावा. खूप लाल करू नये.३. आता त्यात गूळ घालावा. गूळ विरघळू लागतो आणि त्याचा पाक होऊ लागतो. गूळ पूर्ण विरघळला की, त्यात ओल्या नारळाचा चव घालावा आणि चांगले हलवावे. नारळ त्यात शिजू लागतो. आणि गूळाचा पाक घट्ट होऊ लागला की, त्यात शिजवलेला भात घालावा आणि चांगले हलवावे. हलवताना शिते मोडू नयेत. वरून तूप सोडावे. आणि पुन्हा एकदा वाफ येऊ द्यावी. चांगली वाफ आली की गॅस बंद करावा. हवा असल्यास वरून आणखी सुकामेवा घालावा.
माझी नारळीभात करण्याची अशी पद्धत आहे. आणखी कोणाला काही वेगळे माहीती असेल तर इथे जरूर लिहावे ही विनंती.