गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

मक्याच्या कणसांची भाजी

जिन्नस
ताजी मक्याची कणसे -२ (बेबी कोर्न नव्हेत)
धन्याची पूड-२ टे. स्पून ,जीरयाची पूड- २ टे. स्पून.
आलं, लसूण, २कांदे
दाण्याचे कूट- २ वाट्या
मीठ, गूळ, -आवडीप्रमाणे
फोड्णीचे साहित्य,कोथिंबीर,
मार्गदर्शन
१)सर्वप्रथम कणसे धुऊन घ्या.एका कणसाचे चार तुकडे करून घ्या.२) कांदे बारीक चिरून घ्या.३)फोडणी करून त्यात आलं, लसूण, कांदे परतून घ्या.४) त्यामधे धने-जिरे पूड,दाण्याचे कूट घालून परतून घ्या. ५)आता यामधे १ वाटी पाणी घालून हलवा.मीठ, ग़ूळ , कोथिंबीर घाला.६) या सर्व मिश्रणामधे कणसाचे तुकडे घालून नीट एकत्र करा.७) झाकण ठेवून १५ मिनिटे शिजवा.
टीपा
पोळी, पराठा याबरोबरच, पुलाव किंवा बिर्याणी बरोबरही छान लागते.वाढायच्या आधी मक्याचे दाणे शिजले आहेत याची खात्री करून घ्या.पाण्याचे प्रमाण तुमच्या मनाप्रमाणे कमी-जास्त करा.