गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

काकडी वडे

जिन्नस
वाट्या तांदूळ पिठी, एक वाटी काकडीचा कीस, एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा सुंठ, अर्धा चमचा बडीशेप ( ठेचून घ्यावी ),
२-३ चमचे तिखट, चवीपुरते मीठ, तूप.
मार्गदर्शन
थोडे तूप घालून सगळे पदार्थ एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावे. हातावर किंवा प्लास्टीकच्या कागदावर वडे थापावेत. तूपात तळून गरम गरम सर्व्ह करावेत. सोबत गोड दही द्यावे.