शनिवार, १३ डिसेंबर, २००८

रबडी

साहित्य-२ लिटर दूध(जास्त फॅट असलेले), १ वाटीभर साखर, वेलचीपूड,केशराच्या काड्या, बदाम,पिस्त्यांचे काप,चारोळीकृती-मायक्रोव्हेव प्रूफ काचेच्या भांड्यात दूध घ्यावे, ८०० वॅटला ३ मिनिटे गरम करावे, दार उघडून ढवळावे.परत ३ मिनिटे गरम करावे. असे दूध निम्मे होईपर्यंत करावे. मग साखर घालून ढवळावे,परत ३ मिनिटे गरम करावे.ढवळून परत आटवावे. असे जितकी दाट रबडी हवी तितके आटवावे.दूध उतू जाणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते.मी १०% फॅट असलेले कोंडेन्स्ड मिल्श घेते म्हणजे कमी आटवायला लागते.मायक्रोव्हेव नसेल तर आपल्या पारंपरिक पध्दतीने मोठ्या आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे. आटवताना सारखे ढवळावे नाहीतर दूध लागते/उतू जाऊ शकते.ज्यांना साय आवडत नाही अशा(माझ्यासारख्यां)साठी- दूध थोडे गार झाले की ब्लेंडर किवा हँडमिक्सर दूधात फिरवून साय मोडून काढावी.नंतर केशराच्या काड्या,वेलचीपूड,बदामपिस्तेकाप,चारोळी इ. घालावे.रबडी फ्रिजमध्ये ठेवून थंड करावी.ही थंडगार रबडी चांदीच्या वाटीतून किवा नक्षीच्या नाजूक काचेच्या बाउल मध्ये घेऊन खावी.आपण जरी काचेच्या किवा चांदीच्या बाउलमधून रबडी खात असलो तरी डोळ्यासमोर बनारसची द्रोणातली रबडी आणावी, उसकी तो बातही अलग है!