शनिवार, १३ डिसेंबर, २००८

मॅकरोनी सलाड

जिन्नस
१. मॅकरोनी (एल्बो अथवा कुठलाही आकार)
२. मॅकरोनी बुडून वर राहील इतके पाणी ती शिजवायला आणि चवीप्रमाणे मीठ
३. डिस्टील्ड व्हाईट विनेगार ३ चहाचे चमचे
४. मेयोनीज अर्धी वाटी
५. काळी मिरी पाउडर १ चहाचा चमचा
६. साखर चवीप्रमाणे (अगदी चिमुटभर आवडत असल्यास)
७. १ कांदा (बारीक चोकोनी चिरून)
७. १ टोमॅटो (बारीक चोकोनी चिरून)
९. १ वाटीभर हिरवी/लाल/पिवळी सिमला मिरची (बारीक चोकोनी चिरून) + मुठभर कोथिंबीर चिरून
मार्गदर्शन
मायक्रोवेव्ह मध्ये काचेच्या वाडग्यात पाणी उकळात ठेवून त्याला उकळी आली की मॅकरोनी घालून त्यात मीठ घालून ती बोटचेपी शिजवून घ्यावी आणि चाळणीवर निथळत ठेवावी
एका वाडग्यात मेयो आणि विनेगार चांगले फेटून मग वरील (क्रमांक ५ ते ९) जिन्नस चांगले मिसळून घ्यावेत आणि त्यात शिजवलेली मॅकरोनी चांगली मिसळून फ़्रीझ मध्ये सेट करायला ठेऊन द्यावी
१ तासानी बाहेर काढून (म्हणजे सर्व भाज्या आणि ड्रेसिंग्स यांचा छान साद लागतो) हवे असल्यास मेयो घालून ढवळावी पण फार क्रिमी करायची नाही आणि खायला द्यावी.
चित्र: दुवा क्र. १ सोजन्य गूगल
टीपा
मेयोनीज आणि विनेगार मध्ये मीठ असते हे ध्यानात ठेवून सर्वात शेवटी गरज वाटल्यास वरून मीठ घालावे आणि फ्रीझ मध्ये सेट करावे