शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

"अक्सुमो..!!"(भारतीय रवा पिझ्झा...)

साहित्यः

१)कांदा,टमाटे,कोथिंबिर...


२)बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी...३)पिझ्झा तयार करण्याची पुर्वतयारी:

अ]पिझ्झा चटणी: दोन कांदे,५-६ पाकळ्या लसुण,१ टेबल स्पून लाल तिखट,
चवीप्रमाणे मीठ.. थोडे पाणी टाकुन मिक्सरमधे वाटुन घ्यावे.[घट्टसर]

ब] पिझ्झा बेसः रवा,दही आणि सोडाखार कोम्हट पाण्यात तीन तास भिजवुन ठेवावे..
[ईड्लीच्या पिठासारखे..]तीन तासानंतर...

कृती: तवा गरम झाल्यावर त्यावर भिजवुन ठेवलेले मिश्रण [उत्तप्प्यासारखे जाड] टाकावे.
दोन्ही बाजुने भाजुन घ्यावे. भाजतांना तेल सोडावे..

४)पिझ्झा बेस(तयार):+तयार झालेला पिझ्झा बेस वर पिझ्झा चट्णी लावुन घ्या.
+त्यावर बारीक चिरलेला कांदा-टमाटा पसरवुन घ्या , व टमाटा सॉस टाका..
+वरुन पिवळी बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबिर.

५)तयार अक्सुमो पिझ्झा.....