शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

एवढं कर

सूर्याच्या मांसल त्वचेवर दिवसांच्या सुया टोच
अंधाराची मेणबत्ती पेटव.
सगळी आत्मचरित्रे दोनदा वाच.
एकदा स्तुती, दुसऱ्यांदा कंटाळा.
खोट्या चपलेत खोटे पाय घाल.
खोटे खोटे फिरून ये.
मोकळ्य हवेशी झोंब.
दचकून उठ.
कविता लिहण्याचं नाटक कर.
न जमल्यास
एक पत्र लिही.
फाडून टाक. पुन्हा लिही.
नंतर
गिचमिड्या सहीच्या दोरीत
चेहरा ओवीत बस
माझा, अंधाराचा किंवा
आपल्य संबंधीचा