शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

रेडी टु कुक (खास भटक्यांसाठी)

बहुसंख्य भटक्यांच त्यांच्या भटकंती दरम्यान जेवण म्हणजे दालखिचडी. हि दालखिचडी प्रवासा दरम्यान बनविण मजेच आणि गरजेच असलं, तरी कधी-कधी शिणवट्या मुळे कंटाळवाण सुद्धा होतं.
म्हणुन सादर आहे "रेडी टु कुक"

साहित्य

१.तांदुळ धुवुन किंवा तसेच घ्यावेत.
२.आपल्या पसंतिच्या डाळी (आख्खे मुग, मुगडाळ(पिवळी), मसुर डाळ, तुरडाळ)
३.फ़ोडणी साठी तेल व ईतर साहित्य जसे जिरे,मोहरी,हिंग,हळद,धने, (आवडत अस्ल्यास बडिशेप,) कडीपत्ता, तमालपत्र,लवंगा ई.
४.लाल-सुक्या किंवा हिरव्या मिरच्या किंवा लालतिखट
५.मिठ
६.चवीपुरता गरम मसाला
७.कच्चे शेंगदाणे

कृति

१.प्रथम भांड्यात तेल गरम करावे. +
२.गरम तेलात जिरे,मोहरी,हिंग,कडीपत्ता ई.सर्व साहीत्य घालावे. येवढ्यात हळद घालुनये.(नाहीतर करपल्याने कडवट चव येइल.) +
३.या फ़ोडणित कच्चे शेंगदाणे तसेच सुक्या किंवा हिरव्या मिरच्या किंवा लालतिखट चांगले परतुन घ्या. हिरव्या मिरच्या असल्यास चिवड्या प्रमाणे खरपुस/कुरकुरीत परतुन घ्या. थोडाक्यात पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या. +
४.या मिश्रणात तांदुळ + डाळी (तांदुळ व डाळ यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे) चांगले खरपुस भाजुन घ्या. चवी प्रमाणे मिठ घाला+हळद घालुन परत थोडा वेळ परतुन घ्या.
५.थंड झाल्यावर हे मिश्रण हवाबंद बरणीत भरुन ठेवा. साधारण १०/१५ दिवस सहज टिकते. टिकाउ पणाचा उद्देश साधण्यासाठीच इथे कांदा,बटाटा किंवा टोमेटो वापरलेला नाही.

भटकंतीला जाताना हे मिश्रण सोबत घ्या. मस्त पैकी ३ दगडांची चुल मांडा, पाणी गरम करुन त्या मधे हे वरील "रेडी टु कुक" मिश्रण टाकुन शिजवा सोबत छानपैकी पापड भाजा आणि आवड्त्या लोणच्या बरोबर दे दनादण सुरु करा.(ही खिचडी शिजत अस्ताना आपापल्या आवडीप्रमाणे त्यामधे गाजर,मटार,कांदा,बटाटा किंवा टोमेटो वापरता येतो.भटकंती दरम्यान बटाटा व खजुर खाण्यात जास्त ठेवावा.)


याच पध्दतीने...... उपमा
१.नुसता रवा खरपुस भाजुन घ्यावा.
२.(तांदुळ आणि डाळींच्या ऐवजी) फ़ोडणीत भाजलेला रवा एकत्र करुन परत भाजावा.
३.थंड झाल्यावर हे मिश्रण हवाबंद बरणीत भरुन ठेवा. साधारण १०/१५ दिवस सहज टिकते.
४.भटकंतीला जाताना हे मिश्रण सोबत घ्या. मस्त पैकी ३ दगडांची चुल मांडा, पाणी गरम करुन त्या मधे हे वरील "रेडी टु कुक" मिश्रण टाकुन शिजवा.(प्रमाण=१ वाटी मिश्रणास २ वाट्या पाणी)
तयार आहे गरमा गरम वाफळलेला उपमा.