शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

खजूर-सफरचंदाचे लोणचे | Pickle Recipes

साहित्य :

५०० ग्रॅम आंबटसर सफरचंदे, २५० ग्रॅम बिनबियांचा खजूर, ५०० ग्रॅम साखर, २ मोठे चमचे तिखट, २ मोठे चमचे मीठ, १ वाटी किंवा कप व्हिनीगर


कृती :

सफरचंदाच्या मधला भाग व बिया काढून पातळ तुकडे करावे. साल काढू नये. ५ मिनिटे चाळणीवर तुकडे वाफवावे व गार होऊ द्यावे. खजुराचे बारीक तुकडे चिरावे. साखरेत व्हिनीगर घालून जाडासर पाक करावा. त्यात तिखट, मीठ, सफरचंद व खजूर घालून ढवळावे. मिश्रण मंद आंचेवर ५-७ मिनिटे उकळू द्यावे. खाली उतरवून गार करावे. स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. पोळी, पुरीशी किंवा ब्रेड सॅंडविचेसमधे चांगले लागते.