मंगळवार, २९ जून, २०१०

स्वस्तात्.........अ‍ॅटोमॅटीक इस्त्री करा

इस्त्री करायचा एक मस्त आणि स्वस्त उपाय .
अगदी तीन चार रुपयात एकाच वेळेस मल्टीपल कपड्याना मस्त इस्त्री होते

रुमाल ओढण्या लुंग्या प्यान्ट( ट्राउझर्स) वैगरेना इस्त्री या उपकरणाची गरज भासत नाही. हे कपडे व्यवस्थीत घडी करून गादीखाली ठेवायचे आणि एखादा बळकट वजनदार रुंद शेजारणीला घरी चहाला बोलवावे. नेमके जेथे कपडे गादीखाली ठेवले आहेत त्याच ठीकाणी त्याच गादीवर तीची स्थापना करावी. चहा देण्यापूर्वी इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात. चहाला भरपूर वेळ लावावा. ती रुंद शेजारीण त्या विवक्षीत जागेवरून हलणार नाही अशी दक्षता घ्यावी. साधारण पंधरा मिनिटानन्तर शेजारणीला निरोप द्यावा. आता गादीखालील कपडे जादुने आपोआप इस्त्रीचे झालेले असतील
खर्चः तीन ते चार रुपये ( चहा/ग्यास्/साखर वगैरे)
बचतः प्रती कपडा रू पाच प्रमाणे इस्त्रीचा खर्च/ विद्यूत बचत
सोशल नेटवर्किंग ची उत्तम संधी/ आसपासच्या बातम्या फुकटात मिळतात/ आपल्याला
अफवा पसरवता येतात.
वापरलेले गेलेले भौतीक शास्त्रीय तत्व : गुरुत्वाकर्षण
वापरलेले गेलेले समाजशास्त्रीय तत्वः शेजार्‍यावर प्रेम करा
धोक्याची सूचना: अवांतर विषयावर गप्पा मारण्यासाठी सासू हा विषय ओपन स्वतःच्या जबाब्दारीवर करावा